बाजारातील महागड्या कुंड्या वापरण्यापेक्षा सगुणा बॅग्जस वापरा.
organic भाजीपाला उगवण्यासाठी उपयुक्त.
उपलब्ध जागेत या बॅग कुठेही सामवू शकते.
सहजतेने भरता व रिकाम्या करता येतात.
सहजतेने रिपॉटींग करता येतात.
कमीत कमी दहा वर्ष टिकेल.
कमी जागेत जास्त बॅग्स सामावू शकतात.
मागील २४ वर्षाच्या अनूभवाचे तंत्र.
विंडोग्रील, टेरेस, बाल्कनी येथे वापरता येईल.
एकाच साईजची बॅग ची बाग सुंदर करा.
जवळपास ३५ प्रकारच्या भाज्यांचे यात उत्पादन घेता येते. पालेभाज्या, फळभाज्या, निवडक वेलवर्गीय, कंदमुळे व एक्सोटिक्स भाज्यापण उगवता येतात. पालेभाज्यामधे पालक, कोंथबिर, मेथी, शेफू, अंबाडी, आंबटचुका, तांदुळका, हिरवामाठ, लालमाठ, तर फळभाज्यामधे वांगी, टोमॅटो, चेरी टोमॅटो, भेंडी, गवार, मिरची, सिमला मिरची, फ्रेंच बिन्स इ. कंदमुळामधे आलं, रताळी, गाजर, सफेद व लाल मुळा इ. वेलवर्गीयांत तोंडली, काकडी, कारले. इ. तर एक्सोटिक्स मधे झुकीनी, सेलेरी, लेट्यूस, रेड कॅबेज, तर इतर भाज्यांमधे फुलकोबी, पत्ताकोबी, नवलकोल इ. उत्पादन सहजतेने घेता येते.
ही ग्रो बॅग वैज्ञानिक पध्दतीने काम करते. रोपांच्या मुळाना उब मिळाल्यामुळे पांढर्या मुळ्यांची संख्या वाढते.
खरं तर बॅग वापरून पाहिल्यावर कळेल की बागकाम करणे किती सोपे आहे ते.
फळभाजी सोबत इतरही पालेभाज्या लागवड करता येतात. एक चौरस फुटात तुम्ही तिन भाज्या लागवड करता येतात.
तुम्ही टेरेस वर लोखंडी स्टॅंडवर ठेवू शकता.
किंवा प्लिंथ वॉलवरही ठेवू शकतो.
बाल्कनी, खिडकी, विन्डो ग्रिल, गच्ची Terrace जेथे जागा उपलब्ध असेन तेथे ठेवा. सहजेने उचलता, हलवता येते. रिपॉटींग करता येते. रिकामी करता येते. माती घट्ट होत नाही.
सगुणा गार्डेनिंग बॅग्जस ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आम्हाला गेले २३ वर्ष प्रयोग करावे लागले. यातील प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक व विज्ञानाचा वापर केला आहे.
अन्नपूर्णा बॅगची बाग
बॅगची साईज किती आहे ?
बॅगची साईज ही १० लिटर क्षमतेची आहे. ११ बाय ११ इंच होय. म्हणजे उंची व रूंदी ही १ १ इंच होय. भरल्यानंतर हीचा घेर साधारण ३२ इंचाची होते.
बॅगेचे आयुष्य किती?
बॅग आमच्या पध्दतीने भरली असल्यास व निट काळजी घेतली तर तिचे आयुष्य हे साधारण ३६५० दिवस आहे. म्हणजे १० वर्ष टिकू शकते.
पूर्नवापर करू शकतो का?
नक्कीच एक पिक साधारण तीन महिण्याचे असते.
त्यानंतर बॅगेतील माती काढून वाळवून घ्यावी.
(ऑक्टोबर, फेब्रुवारी, मे-जून दरम्यान माती वाळवता येते.
पुन्हा बॅग भरावी. त्यात रोपे किंवा इतर बियाणं लागवड करावी.