The custom code element you just added won’t be visible in the editor here. Please go to the published page URL after publishing, you will be able to find your element there.
kzode_52_rMH1diogFS5285qgxH3iXn52icon1

ज्ञानार्जन हेच आर्थाजन करते.

  अन्नपूर्णा बॅग्स खरेदी केल्या असतील किंवा करावयाच्या असतील तर हे संपूर्ण पुस्तक वाचलेच पाहिजे. 

पुस्तकाबदद्ल :

विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज झाली आहे. बाजारात विषमुक्त भाज्या मिळत असल्यातरी त्यांची कोणीही १०० टक्के खात्री देत नाही. त्यामुळे घरी लागणारा भाजीपाला हा घरी उगवणे हे केव्हांही खात्रीशीर आहे. पण कधी जागेचा अभाव तर कधी वेळेचा अभाव, तर कधी सारी जमवा जमव करायला फारच वेळ लागतो. हे सारं झालं तर कामाला माणूस भेटत नाही. हे सारं स्वतः करायचं म्हटलं तरी शिकण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. ही काहीही कटकट नको. पेरलं की उगलं पाहिजे, भले पाणी आम्ही देवू. कीड नियंत्रणासाठी आम्ही फवारणी करू, बियाणं पेरू पण हा सारा व्याप नको. याच तत्वावर रेडीमेड गार्डेनिंग बॅग्जस म्हणजे पेरण्यास तयार बॅग्ज आम्ही तयार केल्या आहेत.

अन्नूपूर्णा बॅग्ज ही आमच्या हॉट न् टॉप फाईव्ह प्रोडक्ट्समधील क्रं. १ चे उत्पादन आहे. महाराष्ट्रातील तमाम लोकांनी त्यास प्रतिसाद देत आहेत. आरोग्याबद्दल जागृक व इच्छुक मंडळी अन्नपूर्णा बॅग्जस घरी घेवून जात आहेत. त्याचा प्रचार प्रसार करत आहेत. पण ही अन्नपूर्णा बॅग्ज म्हणजे नेमकं काय? त्यात काय काय मटेरियल वापरले आहे? या बॅगेत काय काय उगतं? त्यांच मेन्टंनन्स कसं करायचं? या बद्दलची एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे या पूस्तकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मागील अ.ब. ब. तंत्र या पुस्तकात दिल्याप्रमाणे याही पुस्तकात आम्ही माहितीदायक व्हिडीओ सुध्दा दिले आहेत. तसेच या पुस्तकात बॅग्ज गार्डेनिंग बद्दल माहिती दिली आहे. वाचकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.


आतापर्यंत आम्ही १००० बॅग्जस वितरीत केल्या आहेत. या सर्व अनुभवांचा सार आम्ही तुमच्या समोर ई स्वरूपातील पुस्तकात देत आहोत. अन्नपूर्णा बॅग्जस हे उत्पादन समजून घेण्यासाठी इच्छुकांना जागोजागी व्हिडीओ दिले आहेत. त्यावर क्लिक करून वाचकांनी विषय समजून घेतला पाहिजे. तसेच इतरही काही मुद्दयांचा जागेअभावी उहापोह करणे शक्य नाही. त्यासाठी वाचकांनी आमच्याशी संपर्क साधावा म्हणजे मार्गदर्शन करता येईल. किंवा गच्चीवरची बाग निर्मित इतर ई- पुस्तकातूनही माहिती मिळू शकेन.

टीपः हे पुस्तक अन्नपूर्णा बॅग्ज म्हणजे काय, त्या कशा हाताळ्यात यासाठी तयार केले आहे. रेडीमेड बॅग्स आमच्याकडे मिळतील. किंवा साहित्य नेवून तुम्ही भरू शकता.

  • check_circleA) संकल्पना...
    1) का? चे महत्व
    2) बॅग गार्डेनिंग म्हणजे काय?
    3) बॅग्ज भरण्याच्या पध्दती कोणत्या?
    4) बॅग्जस भरण्याच्या पध्दती सविस्तर माहिती..
    B) बॅग्ज संदर्भातील आमची चैन प्रोडक्टस व सविस्तर…
    5) सगुणा बॅग म्हणजे काय ?
    6) अन्नपूर्णा बॅग म्हणजे काय ?
    7) सलाद मिनी बॅग्जस म्हणजे काय ?
    8) संपूर्णान्न बॅग म्हणजे काय ?
    9) व्हेजीस टॉवर काय संकल्पना आहे?
    10) मशरूम ग्रो बॅग म्हणजे काय ?
    C) अन्नपूर्णा बॅग्जसविषयी सर्व काही…
    11) अन्नपूर्णा बॅग्ज का वापरावी ?
    12) बॅगेत कोणते साहित्य भरलेले असते ?
    13) बिशकॉम म्हणजे काय?
    14) लालमाती का वापरावी?
    D) बॅगेचे वैशिष्ट्ये काय आहेत…
    15) वजनाला हलकी असते
    16) बॅग भरल्यानंतरचे बॅगेचे वजन
    17) भाजीपाला उत्पादन झाले सोपे
    18) कमी जागेत जास्त सामावतात
    19) अतिरिक्त , छुपा खर्च व श्रम वाचते
    20) अपेक्षेपेक्षा जास्त भाज्या येतात
    21) निसर्गाचे चक्र म्हणजे काय?
    22) रिपॉटींग करणे सोपे
    23) पाणी कमी लागते
    24) सच्छिद्रता भरपूर असते
    25) हंगामानुसार भाज्या पिकतात
    26) बाहेरगावी नेता येतात
    27) स्थलांतरीत करता येतात
    E) अन्नपूर्णा बॅग का परवडते
    28) पैसा वसूल बॅग्जस
    29) साहित्य जमा करण्याची गरज नाही
    30) सहजतेने बागकाम करता येते
    31) खुरपी करण्याची गरज नाही
    32) २९ दिवसात भाज्या सुरू
    33) माती बदलवण्याची गरज नाही
    F) बॅगे बद्दल
    34) बॅगचा हाच आकार व त्यामागील कारणं ?
    35) बॅग्जस कुठे ठेवता येतात ?
    36) बॅग्जची अशी घ्या काळजी
    37) बॅग्जची वरची बाजू फाटली तर ?
    38) बॅगखाली काय ठेवावे व का ?
    39) बॅगेची घडी करता येते
    40) बॅग्जसाठी स्टॅंड कसा तयार करावा ?
    41) बॅग्जस कशी हाताळावी ?
    42) बॅग्जस कशी रिकामी करावी ?
    43) बॅगा कुंड्यामधे ठेवा
    44) बॅगेचे आयुष्य किती ?
    45) रिपॉटींग म्हणजे काय? कधी व कसे करावे ?
    46) बॅगेचा पुर्नउपयोग करू शकतो का ?
    47) बॅगतील माती कशी व कधी वाळवावी ?
    G) इतर मुददे
    48) ड्रीप करू नये
    49) बॅगेचा जमिनीवर वापर करतांना काय काळजी घ्यावी ?
    50) खरचं किंमत वसूल होते का?
    H) बागेची देखभाल...
    51) स्वच्छता फार महत्वाची
    52) देखभालीसाठी काय साहित्य लागते ?
    53) कीड नियंत्रण कसे करावे ?
    54) काचेची भिंत असेल तर .... ?
    55) गोगलगाय नियंत्रण
    56) दक्षिणायन व उत्तरायण
    I) उन्हाच्या उपलब्धतेनुसार भाज्या लागवड...
    57) पालेभाजी
    58) कंदमुळ, फुलवर्गीय व फळंभाज्यासाठी
    59) वेलवर्गीय भाज्या.
    J) भाज्यांचे वर्गीकरण...
    60) पालेभाजी व रानभाज्या
    61) कंदमुळं व फळभाज्या.
    K) बियाणे व लागवड
    62) वन स्व्केअर गार्डेनिंग
    63) बियाणे कसे पेरावे
    64) बियाणांचा आकारानुसार वर्गीकरण
    65) बियाणांचा आकारानुसार यादी
    66) बियाणांची निवड कशी करावी
    67) बियाणं किती अंतरावर पेरावीत?
    68) रोपे कशी तयार करीवी
    L) महत्वाच्या टिप्स
    69) व्यायाम व मेडीटेशन
    70) वेळोच्या वेळी काम
    71) निशुल्क मार्गदर्शन मिळवा
    72) अभ्यास कसा करावा ?
    M) ऑफर व संबधीत सेवा
    73) नाशिककरांसाठी
    74) बाहेगावच्या इच्छुकांसाठी
    75) हॉट न् टॉप फाईव्ह प्रोड्कटस
    76) ई पुस्तकांची यादी.

अन्नपूर्णा बॅग्जस चे वापरकर्ते...

© 2022 Gacchivarchi Baug Nashik