नमस्कार ! मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक या पर्यावरण पुरक कार्यक्रमाचा संस्थापक व अध्यक्ष. मी गेल्या 24 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. ऑरगॅनिक पध्दतीने झाडं जगवता येतात. तसेच अन्न अर्थात भाजीपाला उगवता येतो. मला या गोष्टीची खूप आकर्षण होते व त्यातूनच माझी पॅशन तयार झाली. ही पॅशनच आता माझं प्रोफेशन म्हणून तयार केले आहे. 2001 पासून यात काम करायला सुरूवात केली. ज्या ज्या माध्यमांतून इच्छुकांना शिकवता येईल ते सर्व प्रयत्न केले. हे जूणू माझे लाईफ मिशनच झाले. व आता मागील 24 महिण्यापासून लोकांना ऑनलाईन पध्दतीने शिकवत आहे.