
छोट्या जागेतही फुलवा निसर्ग

जेवढी जागा छोटी, तेवढी त्याला ऑरगॅनाईज करणे सोपे जाते.
उन सावलीच्या उपलब्धतेनुसार आपल्याला झाडांची निवड करता येते त्यास जोपासता येते.
जी काही उपलब्ध जागा आहे त्याचा सृजनशिलतेने वापर करता येतो
जागा जेवछी छोटी असेन त्याला आणखी चांगल्या पध्दतीने ऑरगनाईज करता येते.
आपल्याला निसर्गात जाता येत नाही म्हणून काय झालं. निसर्ग आपल्या जवळ आणता येतो.
जेथे अभाव असतो तेथेच आवडपण प्रचंड असते. पण सावकाश सुरूवात करा.
प्रत्येक वनस्पतीचा एक स्वभाव, आवड निवड, फुलण्याचा अवाका असते. त्यांच्या स्वभावानुसारच जागा उपलब्ध करता येते.
विंडो एवढी जागा असली तरी त्यात काही वेलवर्गीय भाजीचे व फुलाचे वेल सुध्दा लागवड करता येते.
ताजी व नुकतीच फुललेली फुलं ही देवपुजेसाठी गरजेची असतात. ती घरीच मिळवता येतात.
विंडों गार्डेनिंग मधे सुद्धा आपल्याला घरच्या ओल्या कचर्याचे उत्तम रित्या व्यवस्थापन करता येते.
उत्तरायण व दक्षिणायन तसेच उन्हाळा व गरम हवेतही विंडो गार्डेनिंग करता येते.
केवळ विंडो / विडों ग्रील मधील जागेचा वापर आपण घरातील दोन चार कुंड्याच्या आदली बदली साठीही वापरता येते.
विंडो व विंडों ग्रील मधे सुध्दा आपल्याला सलाद व भाजीपुरता पालेभाजी उगवता येते. त्याचा आनंद घेता येतो.

© 2023 Gacchivarchi Baug. All Rights Reserved | Design by Grab Digitally