कोकोपीट वापरूनही तुमच्या कुंड्यातील झाडे जगत नाहीयेत, झाडं मरून जातात. मग पॉटींग मिक्स म्हणून बिशकॉमचा वापर करा.
बिशकॉम (Bishcom) म्हणजे विशेष पद्धतीने तयार केलेला सेंद्रिय Potting Mix – हलका, भुरभुरीत आणि जिवंत मातीसारखा अनुभव देणारा!हा कोकोपीटसारखा केवळ भराव नाही, तर मुळांना पोषण देणारा शक्तिवर्धक घटक आहे.
बिशकॉम हे जिवाणूयुक्त प्रक्रिया केलेला पालापाचोळ्याचा चुरा असलेले पॉटींग मिक्स आहे. जे कोकोपीट पेक्षा अधिक उत्पादनशील व अधिक वेळेपर्यंत परिणाम देत राहते. वजनाने हलके असल्यामुळे कुंड्याही हलक्या होतात.
मी कोकोपीठच्या विरोधाच आहे, होतो व राहणार, मग वापरायचं काय ? कारण ते पर्यावरण पुरक असले तरी मेहनतीवर पाणी फिरवणारं आहे. मग त्यासाठीच BISHCOM शोधून काढले. आणी गेल्या 10 वर्षापासून माझी व नाशिककरांची भाजीपाला, फुलझाडांची बाग बिशकॉम वापरूनच फुलवली आहे.
🌾 पालापाचोळ्याचा चुरा
🧫 नैसर्गिक जिवाणूंनी सजीव केलेलं माध्यम🪱
🌿 मातीसारखा पोत व नैसर्गिक कुज प्रक्रिया
♻️ वाळवून, साठवून वापरता येण्याजोगं
🌾 ८०% बिशकॉम + १०% माती + १०% खताचा वापर
🧫 कुंड्या, बॅग्स, ट्रे, थेट जमिनीत करू शकता.
🌿 कोणतीही पिकंः पालेभाजी, फळभाजी, फुलझाडं, सुगंधी झाडं प्रक्रिया
♻️ सर्वांमध्ये उत्कृष्ट परिणाम!
✅ माती हलकी आणि भुरभुरीत राहते
✅ पाणी नीट शोषतं आणि वाहून जात नाही
✅ रूट रॉटपासून झाडं सुरक्षित
✅ Repotting ची गरज कमी
✅ Organic, Eco-friendly
कुंडी भरण्यासाठी आम्ही गेल्या दहा वर्षापूर्वी पालापोचोळा वापरत असू. पण पालापाचोळा साठवणे हे जिकरीचे होते. त्यामुळे सुका पालापाचोळ्यांचा चुरा तयार केला. त्यावर विशिष्टय अशा नैसर्गिक द्रावणांत आंबवून त्यास सावलीत वाळवून कुंड्या भरण्यासाठी उपयोग केला असता. त्याचा परिणाम हा उत्तमरित्या आला. सध्या आमच्या सोशल मिडीयावर प्रदर्शीत केलेल्या सर्व फिल्मस, रिल्स मधे दर्शविलेला भाजीपाला हा BISHCOM या पॉटींग मिक्सनेच तयार करण्यात आला आहे.
Bishcom वापरल्यामुळे कुंड्या वजनाला हलक्या होतातच, योग्य तो वाफसा तयार होतो. पण शिवाय त्यातील माती ही भुरभुरीत राहते. माती मऊसुत असल्यामुळे ति फोडून, कूटून काढण्याची गरज नाही. ती ऊन्हात टाकली की लगेच वाळते. कुंड्यामधील माती वर्षानुवर्ष बदलली जात नाही. त्यामुळे फक्त खत व माती वापरून भरलेली कुंडी कालांतराने दगड होते. पाणी जास्त धरून ठेवते. त्त्यामुळे झाडं ही दगावतात. म्हणूनच वर्षभरात कुंड्या RePotting होणे गरजेचे असते. त्यात १० टक्के माती , १० टक्के खत व ८० टक्के Bishcom वापरले तर माती उत्पादनशील तयार होते.
सहसा बाग प्रेमी व उत्साही मंडळी रंगी बेरंगी कुंड्या विकत घेतात. त्यांना असं वाटतं की रंगीत कुंड्यामुळेच झाडं चांगली वाढतात. हो, एक वेळ रंगीत कुंड्यामुळे बाग चांगली दिसेलही पण कुंड्यामधील झाडं ही तजेलदार, टवटवीत व फुलांनी बहरलेले असतील तरच बाग जिवंत वाटेल. कुंड्यां पेक्षा त्यात काय भरायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. जसे की चांगले कपडे घातले म्हणजे मनुष्यांची पारख होत नाही. तो त्याच्या गुणांवरून पारख होते. तसेच कुंडी कोणती आहे या पेक्षा त्यात नेमकं काय भरण पोषण केलं आहे हे फार महत्वाचे आहे.
म्हणून बिशकॉम हे महत्वाची भूमिका येथे बजावते.
कोकोपीट हे समान आकाराचे तुकडे असतात. जे एकदा कुजायला लागले की एकाच वेळेस त्याचे खतांत रूपांतर होते. खतयुक्त माती ही पाणी जास्त धरून ठेवते. त्यामुळे वनस्पंतीना विवध आजाराची लागण होते. अगदी मुळकुजपासून ते शेंड्याचा चुरडा होणे. यावर उपाय म्हणून बिशकॉम हे उत्तम ठरते. कारण याचा चुरा हा विविध आकाराचा व घनतेचा थोडक्यात वजनाचा असल्यामुळे या सर्वाची एकाच वेळेस कुजत नाही. पर्यायाने कुंडीत झाडे रोगांना बळी पडत नाही. त्यामुळे बाग ही सशक्त असते.
अरूण सुळे, नाशिक मधील जेष्ठ नागरिक. त्यांनी त्यांची बाग छानच फुलवली. पण त्यांनी बिशकॉम वापरले.
बघा ते काय म्हणतात बिशकॉम बद्दल!
निर्मल अष्टपुत्रे, नाशिक मधील निवृत्त संगीत विशारद आहेत. त्यांनी कुंड्यामधेच बाग फुलवली आहे पण ती बिशकॉम वापरूनच.