

रेडी टू ग्रो / सो / प्लॅन्ट या संकल्पनेवर आधारीत, सर्व प्रकारचा भाजीपाला निर्मिती करता येते. विशिष्ट प्रकारचे अमेझिंग पॉटींग मिक्स वापरले आहे.
उपलब्ध जागेत organic भाजीपाला उगवता आला तर? किती चांगले होईल ना.. शिवाय ही बॅग्ज्स रेडी टू ग्रो असेल तर भारीच ना.. माती आणा, खत आणा, कामासाठी माणूस बघा, नाहीतर स्वतःच काम करा.. बियाणं लावा. त्यापेक्षा पेरायला तयार अशा बॅग्जस असेल तर लयंच भारी. ते सुध्दा बिशकॉम पॉटींग मिक्सर सोबत व योग्य खताचा समावेश असलेली अन्नपूर्णा बॅग्जस.. चला तर पाहूया..




जवळपास ३५ प्रकारच्या भाज्यांचे यात उत्पादन घेता येते. पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय , कंदमुळे व एक्सोटिक्स भाज्यापण उगवता येतात. पालेभाज्यामधे पालक, कोंथबिर, मेथी, शेफू, अंबाडी, आंबटचुका, तांदुळका, हिरवामाठ, लालमाठ, तर फळभाज्यामधे वांगी, टोमॅटो, चेरी टोमॅटो, भेंडी, गवार, मिरची, सिमला मिरची, फ्रेंच बिन्स इ. कंदमुळामधे आलं, रताळी, गाजर, सफेद व लाल मुळा इ. वेलवर्गीयांत तोंडली, काकडी, कारले. इ. तर एक्सोटिक्स मधे झुकीनी, सेलेरी, लेट्यूस, रेड कॅबेज, तर इतर भाज्यांमधे फुलकोबी, पत्ताकोबी, नवलकोल इ. उत्पादन सहजतेने घेता येते.
अन्नपूर्णा ही बॅग एक ना अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. खरं ती वापरून पाहिल्यावर कळेल की बागकाम करणे किती सोपे आहे ते.

ही योग्य खत, माती व अमेझिंग पॉटींग मिक्सचा वापर करून तयार करण्यात आली आहे. योग्य ऊन, वारा, खेळती हवा या जागेवर ठेवा. बिया पेरा अथवा भाजीपाल्याची, फुलांची रोपे लावा.

बिशकॉम हे नाविन्यपूर्ण पॉटींग मिक्सर कंन्टेंट म्हणून वापरले जाते. जे संपूर्णतः नैसर्गिक रित्या तयार केले जाते. सुकलेल्या पालापाचोळ्याच्या चुर्यात जिवाणू संवर्धन केलेले असते.

बाल्कनी, खिडकी, विन्डो ग्रिल, गच्ची Terrace , जमिन जेथे जागा उपलब्ध असेन तेथे ठेवा. सहजेने उचलता, हलवता येते. रिपॉटींग करता येते. रिकामी करता येते. माती घट्ट होत नाही.

रेडीमेड गार्डेनिंग बॅग्जस ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आम्हाला गेले पाच वर्ष प्रयोग करावे लागले. यातील प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक व विज्ञानाचा वापर केला आहे.
✅ जे घराच्या गॅलरीत, खिडकीत किंवा टेरेसवर बाग उगवू इच्छितात!
✅ ज्यांना वेळ नाही! पण निसर्ग तर फुलावायचा आहे!
✅ जागा कमी आहे पण हवी आहे स्वच्छ, ताजी, विषमुक्त भाजी!
✅जे किचन वेस्ट वापरून काहीतरी चांगलं उगवायचं स्वप्न बघतात!
✅बिया टाकल्यावर आठवड्यांभरात रोपं उगवतात
✅ घरच्या घरी ताजी, सुरक्षित भाजी तयार
✅ १ बॅग = ३ महिन्यांचा पीकाचा खर्च वसूल
✅ बॅगचा पुन्हा वापर शक्य
✅ कमी वेळ, कमी पाणी, पण भरपूर समाधान!
"माझ्या गॅलरीतून दररोज ताजी मेथी, पालक मिळतोय. अन्नपूर्णा बॅगमुळे बागकाम एकदम सोपं वाटायला लागलं!"— प्रांजली हनगुंटे, नाशिक
"माझ्या आईने पहिल्यांदाच कुंडीत मेथी उगवली, आणि आनंद गगनात मावेनासा झाला!"— गौरी ताकडे


अन्नपूर्णा बॅग्जही वजनाला हलकी असली तरी ती बाहेरगावी पाठवता येत नाही. तुम्हाला या बॅग्जस गच्चीवरची बाग, नाशिक येथील फर्म अर्थात वर्कशॉप येथून संकलन करता येईल.
बॅगची साईज ही १० लिटर क्षमतेची आहे. ११ बाय ११ इंच होय. म्हणजे उंची व रूंदी ही १ १ इंच होय. भरल्यानंतर हीचा घेर साधारण ३२ इंचाची होते.
बॅग आमच्या पध्दतीने भरली असल्यास व निट काळजी घेतली तर तिचे आयुष्य हे साधारण ३६५० दिवस आहे. म्हणजे १० वर्ष टिकू शकते.
नक्कीच एक पिक साधारण तीन महिण्याचे असते. त्यानंतर बॅगेतील माती काढून वाळवून घ्यावी. ( ऑक्टो, फेब्रु, मे-जून दरम्यान माती वाळवता येते. त्यानंतर त्यात पालापाचोळा भरून पुन्हा बॅग भरावी. त्यात रोपे किंवा इतर बियाणं लागवड करावी.


